वास्तवाचे बहुमुखी आकलन, हे या लेखांमधील समान सूत्र आहे!
माणसाच्या समाजजीवनाची कथा साकल्याने समजून घेणे ही जर इतिहासाची व्याख्या मानली तर अधिकृत कागदपत्रे, ग्रंथव्यवहार आणि पुरावे यांच्या कक्षेबाहेरही इतिहास घडला आणि घडवला जातो, याची जाणीव जागती ठेवता येते. त्यामुळेच डॉ. शेंडे यांनी दोन तीन दशकांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये अभ्यासलेल्या वेगवेगळ्या संदर्भसाधनांवर आधारलेले हे इतिहासविषयक लेख वाचकाच्या इतिहासाच्या आकलनात नक्कीच भर टाकतात.......